
कऱ्हाड : अलीकडे साहित्यिकांचे लिखाण हे पुरस्कारासाठी होत आहे. त्यांनी पुरस्कारासाठी लिखाण करताना न करता समाजाच्या हितासाठी करावे. शेतकऱ्यांच्या जगण्याचे वास्तव साहित्यिकांनी समाजासमोर मांडून त्यावरील उपायही त्यात सांगितले पाहिजेत, तरच ग्रामीण साहित्य अधिक समृद्ध होईल, असे मत माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी येथे व्यक्त केले.