स्वच्छतेच्या जागृतीसाठी कऱ्हाडात तृतीय पंथियांची रॅली

सचिन शिंदे
Saturday, 17 October 2020

कोल्हापूर नाक्‍यावरील महात्मा गांधी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीस प्रारंभ झाला. विजय दिवस चौक, वारांगणा वसाहत, बुधवार पेठेतून रॅली भाजी मंडईत गेली. रॅलीत तृतीय पंथियांनी कोरोना जागृतीसह स्वच्छतेचीही जनजागृती केली.

कऱ्हाड (जि. सातारा) : माझे कुटुंब, माझी जबाबदारी उपक्रमांसह शहरातील स्वच्छतेच्या जागृतीसाठी तृतीय पंथियांनी पुढाकार घेत रॅली काढली. येथील कोल्हापूर नाक्‍यावरील महात्मा गांधी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीस प्रारंभ झाला. या वेळी मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्यासह पालिकेचे आरोग्य विभागाचे कर्मचारी, मुकादम उपस्थित होते. शहरातील बहुतांशी तृतीय पंथियांनी जनजागृतीच्या रॅलीत सहभाग घेतला. 

शुक्रवारी सकाळी येथील कोल्हापूर नाका येथून रॅलीस प्रारंभ झाला. या वेळी मुख्याधिकारी डाके यांच्यासह पालिकेचे मुकादम मारुती काटरे, संजय भोसले, राजू सपकाळ, प्रमोद कांबळे, अभिजित खवळे, शेखर लाड, संजय चवरे, संजय लादे, अशोक डाईंगडे, देवेंद्र जाधव उपस्थित होते. पुतळ्यापासून सुरू झालेली रॅली पोपटभाई पेट्रोल पंपापासून थेट दत्त चौकात तेथून मुख्य रस्त्याने आझाद, ते चावडी चौकातून कृष्णा घाटावर तेथून कन्याशाळा, कृष्णा नाका, उपजिल्हा रुग्णालयमार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याकडे रॅली गेली. 

साताऱ्यात धनगर समाजाचा रास्ता रोको; सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

विजय दिवस चौक, वारांगणा वसाहत, बुधवार पेठेतून रॅली भाजी मंडईतही गेली. रॅलीत तृतीय पंथियांनी कोरोना जागृतीसह स्वच्छतेचीही जनजागृती केली. मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्स पाळण्याबाबतही त्यांनी जागृती केली. रॅलीला येथील न्यायालयाच्या परिसरात नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी भेट दिली. रॅली पालिकेत आल्यावर उपाध्यक्ष जयवंत पाटील, लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील, आरोग्य सभापती महेश कांबळे, नियोजन सभापती विजय वाटेगावकर, जयंत बेडेकर, मोहसीन आंबेकरी यांनी रॅलीचे स्वागत केले. त्यानंतर डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून रॅलीची समाप्ती झाली. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rally For Cleanliness Awareness Of Karad City Satara News