
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क वापरणे आवश्यक आहे. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा आदेश मानत नसल्याचे दिसून येत आहे असेही केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी नमूद केले.
सातारा : महाविकास आघाडीतील अनेक आमदार माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आहेत. त्यांना मध्यावधी निवडणुकीची भीती वाटत आहे. त्यामुळे ते अस्वस्थ असून निवडणूक टाळण्यासाठी ते फुटून आमच्याकडे येतील आणि भाजपचे सरकार सत्तेत येईल, असा दावा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.
गेले दोन दिवस आठवले हे सातारा दौऱ्यावर होते. (कै.) बाळासाहेब ठाकरे यांना जे मान्य नव्हते, ते उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी केले आहे. भिन्न विचारधारा असलेल्या पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले असून त्यांच्यात कुरबुरी सुरू आहेत. सन्मानाच्या मुद्यावर कॉंग्रेसने पाठिंबा काढल्यास हे सरकार जावू शकते आणि पुन्हा एकदा "मी पुन्हा येईन' हा देवेंद्र फडणवीस यांचा नारा ऐकण्याची संधी मिळेल, असा दावा करत रामदास आठवलेंनी केला.
Video पाहा : बळीराजाची मोदी एक्सप्रेस; चाळीसचा प्रवास पंचवीस रुपयांत
आठवले म्हणाले,""ज्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा वारंवार विरोध केला, त्याच पक्षांबरोबर उध्दव ठाकरे यांनी सत्ता स्थापन केली आहे. तिन्ही पक्षांत मनभिन्नता असल्याने त्यांच्यात नाराजी आहे. गेल्या काही दिवसांपासून सरकारच्या कारभारावर कॉंग्रेस नाराज आहे. सत्तेत असणाऱ्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना काम करताना अवघड झाले आहे. त्यातच कॉंग्रेसने योग्य सन्मान मिळत नसल्याचे सांगण्यास सुरुवात केली असून ते बाहेर पडल्यास सरकार पडेल.''
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क वापरणे आवश्यक आहे. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा आदेश मानत नसल्याचे दिसून येत आहे.
- रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री
सात वर्षाच्या तुनजाने वडिलांना वाचवले; आजीसह भाऊ वाहून गेला
Edited By : Siddharth Latkar