
-हेमंत पवार
कऱ्हाड : रंगपंचमी खेळण्यासाठी मित्रांसमवेत टेंभु (ता. कऱ्हाड, जि.सातारा) येथील प्रकल्पात गेलेल्या सहा युवक-युवतींपैकी एक युवती पाय घसरुन टेंभु प्रकल्पातील पाण्यात बुडाल्याची घटना आज बुधवारी दुपारी बारानंतर घडली. जुही घोरपडे (रा. कऱ्हाड) असे संबंधित युवतीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगीतले.