मराठा युवकांपुढचे संकट दूर करा; रणजितसिंहांचे राज्यपालांना साकडे

मराठा युवकांपुढचे संकट दूर करा; रणजितसिंहांचे राज्यपालांना साकडे

फलटण शहर (जि. सातारा) : सध्या राज्यात मराठा आरक्षणावरून रान पेटले असताना माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांची नुकतीच भेट घेतली. मराठा आरक्षणाबाबत लक्ष घालून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी आग्रही विनंती त्यांनी केली.
 
दिल्ली येथे महाराष्ट्र सदनात विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी रणजितसिंह यांनी राज्यपालांची भेट घेऊन चर्चा केली. मराठा आरक्षणाबाबत लक्ष घालून मराठा समाजबांधवांना आरक्षण व सद्य:स्थितीत विविध सवलती मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती त्यांनी केली. मराठा समाजातील युवकांचे बरेच प्रश्न अतिशय जटिल बनले असून विद्यार्थ्यांना, युवकांना नोकरी मिळवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. समाजातील अनेक युवकांना शिक्षणापासून व उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण अत्यंत महत्त्वाचे असून याबाबत आपण स्वतः पाठपुरावा करून मराठा आरक्षण मिळण्याबाबत प्रयत्न करावेत, असेही निंबाळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

#MarathaReservation : नेत्यांनाे! चर्चा पुरे; आता आश्‍वस्त करा 

आरक्षण मिळवून देताना राज्यातील सद्य:स्थितीत असणाऱ्या कोणत्याही समाजाचे आरक्षण काढून न घेता मराठा समाजाला स्वतंत्ररित्या आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी मराठा समाजातील सर्वच नेतेमंडळी करीत आहेत. याउलट इतर समाजातील जी नेते मंडळी मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत आग्रही आहेत, त्यांचाही पाठिंबा घेऊन मराठा समाजाला आरक्षण देणे गरजेचे आहे, अशी अपेक्षाही नाईक- निंबाळकर यांनी व्यक्त केली. आगामी काळात महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांचे व सर्वसामान्य जनतेची लॉकडाउनमधील वीजबिले माफ करण्यासाठीही सरकारकडे पाठपुरावा करावा, अशीही विनंती त्यांनी केली.

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com