अत्यंत लहान आणि लाजाळू स्वभावाचा हा पक्षी आहे. तो सहसा पाणथळीतील दाट वनस्पतींमध्ये लपून राहतो. त्यामुळे त्याचे निरीक्षण करणे कठीण असते.
गोंदवले : युरोपच्या पूर्व भागात, तसेच पालेआर्क्टिक प्रदेशातील बेलन्सची फटाकडी (Baillon''s Crake) हा स्थलांतरित, दुर्मिळ पक्षी सातारा जिल्ह्यात पाहिल्यांदाच आढळून आला आहे. दुष्काळी भागातील किरकसाल (ता. माण) येथे नळी या पाणथळीवर हा पक्षी आला आहे. त्याचे निरीक्षण करून ई- बर्ड (e Bird) या आंतरराष्ट्रीय पक्षी निरीक्षण संकेतस्थळावर नोंद करण्यात आली असून, या नोंदीला अधिकृत मान्यताही मिळाली आहे. यामुळे पक्षी निरीक्षक व अभ्यासकांमधून आनंद व्यक्त होत आहे.