esakal | माण बाजार समितीची निवडणूक रासप स्वबळावर लढणार
sakal

बोलून बातमी शोधा

Rashtriya Samaj Party

राष्ट्रीय समाज पक्षाने माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.

माण बाजार समितीची निवडणूक रासप स्वबळावर लढणार

sakal_logo
By
रुपेश कदम

दहिवडी (सातारा) : माण पंचायत समितीचे सभापतिपद (Chairman of Maan Panchayat Committee) मिळाल्यानंतर हत्तीचे बळ संचारलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाने Rashtriya Samaj Party (RSP) माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची (Maan Taluka Agricultural Produce Market Committee) निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. दहिवडी येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीला राज्य कार्यकारिणी सदस्य बबनराव विरकर, रासप तालुकाध्यक्ष दादासाहेब दोरगे, अॅड. विलास चव्हाण, आप्पासाहेब पुकळे, आकाश विरकर, दादासाहेब माळवदे, शिवाजी बरकडे, चंद्रकांत दडस आदी उपस्थित होते. (Rashtriya Samaj Party Will Contest The Election Of Maan Taluka Agricultural Market Committee Satara Political News)

या बैठकीला रासपचे कार्यकर्ते, बाजार समितीच्या ग्रामपंचायत (Gram Panchayat), सोसायटी आणि व्यापारी गटातील मतदारांची उपस्थिती होती. बैठकीत बाजार समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वांनी मते मांडावीत, असे आवाहन बबनराव विरकर यांनी केले. त्यानुसार रासपने (National Social Party) बाजार समितीची निवडणूक (Maan Taluka Agricultural Market Committee Election) स्वबळावर लढावावी, असा सूर सर्वांनी आळवला. या सुरात सूर मिसळत बबनराव विरकर यांनी कार्यकर्त्यांचा भावनांचा आदर करता पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा करून बाजार समितीची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यात येईल, असा निर्णय जाहीर केला. दादासाहेब दोरगे यांनी इच्छुक उमेदवारांनी आपापली नावे पक्षाकडे द्यावीत, अशी सूचना केली.

Rashtriya Samaj Party Will Contest The Election Of Maan Taluka Agricultural Market Committee Satara Political News

loading image