esakal | फोन अ फ्रेंड उपक्रमातून रयतच्या 'या' शाळेतील शिक्षकांच्या विद्यार्थ्यांशी गप्पा
sakal

बोलून बातमी शोधा

फोन अ फ्रेंड उपक्रमातून रयतच्या 'या' शाळेतील शिक्षकांच्या विद्यार्थ्यांशी गप्पा

दररोज सायंकाळी सात ते आठ या वेळेत एकाचवेळी सर्व वर्गांचा फोन अ फ्रेंड' उपक्रम सुरू असतो. त्यामुळे विद्यार्थीदेखील या वेळेत तयार होऊन बसलेले असतात.

फोन अ फ्रेंड उपक्रमातून रयतच्या 'या' शाळेतील शिक्षकांच्या विद्यार्थ्यांशी गप्पा

sakal_logo
By
संजय शिंदे t@ssanjaysakaal

सातारा : कोरोनामुळे शाळा बंद असल्याने अनेक शाळांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी ऑनलाइन पर्याय काढले आहेत. याद्वारे मुलांना ऑनलाइन व्हिडीओ, टेस्ट पाठविल्या जातात. तथापि, विद्यार्थ्यांशी फारसा संवाद साधला जात नाही. त्यामुळे विद्यार्थी हळूहळू ऑनलाइन अभ्यासाकडे पाठ फिरवू लागल्याचे चित्र आहे. यावर येथील रयत शिक्षण संस्थेच्या रा. ब. काळे जीवन शिक्षण मंदिर या शाळेने एक चांगलाच उपाय शोधून काढला असून, विद्यार्थ्यांशी नियमित संवाद साधण्यासाठी "फोन अ फ्रेंड' हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. 

या उपक्रमाद्वारे इयत्ता पहिली ते सातवीचे वर्गशिक्षक दररोज सायंकाळी सात ते आठ या वेळेत आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांशी फोनवरून गप्पा मारतात. त्यांच्या अभ्यासाविषयी चर्चा होते. त्यांना ऑनलाइन अभ्यासाविषयी मार्गदर्शन करतात. शिक्षकांनी फोनवरून संवाद साधल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा सुरू नसल्यामुळे आलेली उदासीनता दूर होत आहे. त्याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापकही स्वत: या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांशी फोनवरून संवाद साधत असल्याने मुलांना अभ्यासाविषयी नवा हुरूप येत आहे.

जैन समाजाच्या पुढाकाराने कऱ्हाडला कोविड सेंटर; कृष्णा, शारदात बेड वाढणार 
 
या शाळेत महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचीदेखील मुले आहेत. सध्या ते आपापल्या गावीच आहेत. यात उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, यवतमाळ अशा विविध दूरच्या जिल्ह्यात हे विद्यार्थी आहेत. "फोन अ फ्रेंड' या उपक्रमातून या विद्यार्थ्यांशीही नियमितपणे संवाद साधला जातो. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरदेखील कळी खुलली आहे. या विद्यार्थ्यांचेही अभ्यासाचे प्रमाण वाढले आहे. त्यांना दूरदर्शनवरून प्रसारित होणारा टिलिमिली' कार्यक्रम पाहण्याचे आवाहनही केले जाते. मुख्याध्यापक अमोल कोळेकर यांना ही कल्पना सुचली. त्यांनी ती आपल्या सहकाऱ्यांना सांगितली. 
मग काय, सुरू झाला "फोन अ फ्रेंड' उपक्रम.

नवीन सीएसना सिव्हिलची घडी बसविण्याचे आव्हान 

या उपक्रमात वर्गशिक्षिका वर्षा भोसले, ज्योती ढमाळ, आशा वाघमोडे, सोनाली गाडे, विजय माने, माधुरी भोईटे, पद्मावती शिंदे हे शिक्षक सहभागी झाले आहेत. दररोज सायंकाळी सात ते आठ या वेळेत एकाचवेळी सर्व वर्गांचा फोन अ फ्रेंड' उपक्रम सुरू असतो. त्यामुळे विद्यार्थीदेखील या वेळेत तयार होऊन बसलेले असतात. पालकांना हे माहित झाल्यामुळे तेदेखील या वेळेत घरीच थांबून आपल्या मुलांना या उपक्रमात सहभागी करून घेत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

loading image
go to top