esakal | Koyananagar : दरडग्रस्तांचे उरमोडी लाभक्षेत्रात पुनर्वसन करा : भारत पाटणकर
sakal

बोलून बातमी शोधा

Bharat Patankar

दरडग्रस्तांचे उरमोडी लाभक्षेत्रात पुनर्वसन करा : भारत पाटणकर

sakal_logo
By
विजय लाड

कोयनानगर (सातारा) - दरडग्रस्तांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाबाबत काहीही स्पष्टता नसल्याने या गावातील जनता व्दिधा अवस्थेत आहे. या गावाचे कायमस्वरूपी पुनर्वसन उरमोडी लाभ क्षेत्रात करून आतापर्यंत कोयना पुत्रांबाबत कृतघ्न ठरलेल्या शासनाने कृतज्ञ बनावे, अशी मागणी धरणग्रस्तांचे नेते श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी केली.

भूस्खलनग्रस्त आंबेघर मिरगाव,हुंबरळी ,ढोकावळे या गावांचा पाहणी दौरा डॉ. पाटणकर यांनी करून आपत्तीग्रस्त जनतेची विचारपुस केली. या वेळी ते बोलत होते. श्रमिक मुक्ती दलाचे हरीशचंद्र दळवी ,महेश शेलार, चैतन्य दळवी, सचिन कदम, रामचंद्र कदम, श्रीपती माने ,सिताराम पवार, तानाजी बेबले उपस्थीत होते. डॉ. पाटणकर म्हणाले,‘‘ दरडग्रस्त असणारी गावे ही कोयना व मोरणा धरणामुळे बाधित झालेली गावे आहेत. त्यांचे अद्याप पुनर्वसन झालेले नाही. आपत्तीग्रस्तांना विविध समस्यांनी ग्रासले आहे. स्वयंसेवी संस्था सोडून अन्य मदत आली नाही. पात्र आपत्तीग्रस्तांना डावलून पुनर्वसनाचा विषय संपला असल्याचे प्रशासन सांगत आहे.

हेही वाचा: महाबळेश्वर : नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांच्यावर याचिका मागे घेण्याची नामुष्की

दरडग्रस्तांचे पुनर्वसन दुर्घटनाग्रस्त गावापासून आठ किलोमीटरच्या परीघातच केले जाणार असल्याचे शासन व प्रशासन सांगत असून, याबाबत कोणतीच स्पष्टता नाही. हे पुनर्वसन म्हणजे आगीतून उठून फोफाटयात पडणाऱ्या सारखे आहे. या दरडग्रस्तांचे जमिनीसह पुनर्वसन होणे गरजेचे आहे. पुनर्वसन कायदयाप्रमाणे गावठाणही मिळाले पाहिजे. उरमोडी लाभ क्षेत्रात या दरड ग्रस्तांचे कोणतेही कारण न देता तातडीने पुनर्वसन करावे.’

साडेचार एकर जमीन शिल्लक

जिल्ह्यातील उरमोडी या लाभक्षेत्रात साडेचार हजार एकर जमीन शिल्लक आहे. ती कोयना प्रकल्पग्रस्तांना वाटप करायची आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात घेतलेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्या ठिकाणी जमीन तयार आहे, पाणी आहे.तिथे गावठाणासाठी जागा तयार आहे. दिड ते दोन हजार पात्र कोयना प्रकल्पग्रस्त पर्यायी जागा वाटपापासुन वंचीत आहेत. तेथे त्यांची सोय होवु शकते, असेही डॉ. पाटणकर यांनी सांगीतले.

loading image
go to top