निर्बंध शिथिल न केल्यास उपोषण करू; महाबळेश्‍वरातील व्यापाऱ्यांचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Protest
निर्बंध शिथिल न केल्यास उपोषण करू; महाबळेश्‍वरातील व्यापाऱ्यांचा इशारा

निर्बंध शिथिल न केल्यास उपोषण करू; महाबळेश्‍वरातील व्यापाऱ्यांचा इशारा

महाबळेश्वर : पर्यटनस्थळावरील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करावेत, यासाठी लवकरच महाबळेश्वरातील (Mahabaleshwar)एक शिष्टमंडळ पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे(Aaditya Thackeray) व पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे यांना भेटून चर्चा करणार आहे. त्यातून मार्ग निघाला नाही बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा येथील व्यापारी, व्यावसायिकांनी आज दिला. शासनाने नुकताच पर्यटनस्थळे बंद (Tourist attraction)करण्याचा आदेश काढला आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी येथील हॉटेल व्यावसायिकांची बैठक येथे झाली. प्रेक्षणीय स्थळे बंद केली, तर महाबळेश्वरमध्ये पर्यटक येणार नाहीत.

हेही वाचा: सातारा : बैठक बोलवा, अन्यथा बांधकाम थांबवा; जिंतीचे धरणग्रस्त संतप्त

त्यामुळे छोट्या-मोठ्या स्थानिक व्यापारी व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येणार असून महाबळेश्वरमधील प्रेक्षणीय स्थळे ही ठराविक निर्बंध ठेऊन सुरू ठेवण्यात यावीत, अशी मागणी शासन दरबारी करणार असल्याचे माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांनी स्पष्ट केले. पर्यटकांवर महाबळेश्‍वरातील अर्थकारण व जीवनमान अवलंबून आहे. मात्र, प्रेक्षणीय स्थळे बंद केली तर महाबळेश्वरमधील हॉटेल, टॅक्सी व घोडे व्यावसायिक, गाईड, कॅनव्हर्सर, छोटे-मोठे व्यापारी आर्थिक संकटात सापडतील. स्थानिक प्रशासनाने गर्दी होणार नाही, अशा पद्धतीने योग्य प्रकारे नियोजन केल्यास प्रेक्षणीय स्थळे सुरू ठेवता येतील. ठराविक निर्बंधांसह पर्यटनस्थळ सुरू ठेवल्यास स्थानिक व्यापारी, व्यावसायिक प्रशासनास सहकार्य करतील, अशी हमीही श्री. बावळेकर यांनी दिली.(Satara mews)

हेही वाचा: बाराशे किलोमीटर पायी चालत आणले उंट; पाच जणांवर गुन्हे

लशीचे दोन डोस घेतलेल्या पर्यटकांनाच हॉटेलमध्ये प्रवेश देतो. मात्र, पुन्हा आता ४८ तास आधीच कोरोना चाचणी निगेटिव्हबाबतचा नवीन नियम हा अन्यायकारक व जाचक असल्याचे हॉटेल संघटनेचे सूर्यकांत जाधव यांनी सांगितले. महाबळेश्वर तालुक्यात प्रवेश करतानाच दोन डोस घेतल्याबाबतचे प्रमाणपत्र दाखवूनच प्रवेश देण्यात यावा. स्थानिक प्रशासनाने याबाबत उपाययोजना कराव्‍यात, असे हॉटेल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले. या बैठकीत पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना भेटून निवेदन देण्याचे ठरले. यावेळी हॉटेल संघटनेचे शंकर जांभळे, आशिष नायडू, ब्रिजभूषण सिंग, धीरेन नागपाल, रोहन कोमटी, नॅलिनो डिक्रूज आदी उपस्थित होते.

हेही वाचा: वाईत घरफोडीसह चोरीचे गुन्हे उघड; अल्पवयीन मुलासह चार जणांचा समावेश

योग्य प्रकारे नियोजन केल्यास प्रेक्षणीय स्थळे, वेण्णालेक, नौकाविहार आदी ठिकाणे सुरू ठेवता येतील. या ठिकाणांची परिस्थिती पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा. ठराविक निर्बंधांसह पर्यटनस्थळ सुरू ठेवल्यास स्थानिक व्यापारी, व्यावसायिक स्थानिक प्रशासनास सहकार्य करतील.

-डी. एम. बावळेकर, माजी नगराध्यक्ष व हॉटेल व्यावसायिक

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top