कोरोनाच्या मुकाबल्‍यासाठी संस्‍थांनी पुढाकार घ्‍यावा; रामराजेंचं आवाहन

कोरोनाची लक्षणे आढळल्यास तत्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधावा
Speaker Ramraje Naik-Nimbalkar
Speaker Ramraje Naik-Nimbalkaresakal
Updated on

सातारा : गेली दीड-दोन वर्षे कोरोनावर (Coronavirus) मात करण्यासाठी शासन आरोग्य सुविधा वाढवत आहे. वैद्यकीय तज्ज्ञ तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तवत असून, त्‍याच्‍या मुकाबल्यासाठी सामाजिक संस्थांनीही पुढाकार घेण्‍याचे आवाहन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर (Speaker Ramraje Naik-Nimbalkar) यांनी केले. येथील (कै.) क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील बाल कोविड अतिदक्षता विभागाचे सभापती रामराजे यांच्याहस्ते लोकार्पण झाले. त्या वेळी ते बोलत होते.

Summary

तिसऱ्या लाटेत लहान मुले बाधित होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

या वेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, ‘पद्मश्री’, माजी आमदार लक्ष्मण माने, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल, पुणे आरोग्य सेवा परिमंडलचे डॉ. संजोग कदम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण आदी उपस्थित होते. पश्चिम महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. ही संख्या का कमी होत नाही, याचा अभ्यास केला पाहिजे. त्यासाठी तज्ज्ञांचे पथक तयार करावे. कोरोनाच्या लढाईत डॉक्टर, पोलिस तसेच आरोग्य सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले. यापुढेही ते चांगले काम करतील, असा विश्वासही रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केला.

Speaker Ramraje Naik-Nimbalkar
खंडाळ्याला लशीचा पुरेसा साठा द्या; पंचायत समितीत 'ठराव'

तिसऱ्या लाटेत लहान मुले बाधित होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. लहान मुले उपचारापासून वंचित राहणार नाहीत, याची जिल्ह्यात तयारी करण्यात आली आहे. कोरोनाची लक्षणे आढळल्यास तत्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी या वेळी केले. बाल कोविड अतिदक्षता विभागास मदत करणाऱ्या विविध संस्थांचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Satara Highway weekend traffic
Greater Flamingo sighting
Koyna Dam reservoir live storage report July 2026
Koyana Dam Water Release
Marathi News Esakal
www.esakal.com