प्रत्येक बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे करा : सभापती रामराजे

उमेश बांबरे
Monday, 19 October 2020

अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीबाबत सातारा येथे सविस्तर आढावा आज (सोमवार) विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी घेतला.

सातारा : अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरु झाले आहे. या पंचनाम्यातून एकही बाधित वंचित शेतकरी राहू नये, अशी सूचना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या. 

अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीबाबत सविस्तर आढावा आज विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी घेतला. यावेळी आमदार मकरंद पाटील, दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. शेती नुकसानीचे पंचमनामे करण्याचे काम सुरु आहे. या पंचनाम्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करुन तसा नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर करावा, अशा सूचना पालकमंत्री श्री. पाटील यांनी केल्या. आपण येत्या आठवड्यात संपूर्ण आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

गळिताची तयारी, पण एफआरपीचे काय?; शेतकरी संघटनांच्या भूमिकेकडे लक्ष

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A Review Meeting Was Held In Satara On The Damage Caused By The Rains Satara News