
- सुनील कांबळे
पाचगणी : भोसे (ता. महाबळेश्वर) येथे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने स्ट्रॉबेरीच्या शेतीत नवे युग सुरू झाले आहे. बेरी फ्रेश ॲग्रोटेक एलएलपी या कंपनीने हवामान नियंत्रित पॉलिहाऊस शेती विकसित केली आहे. त्यामध्ये उत्पादन वाढीबरोबरच फळांच्या गुणवत्तेतही मोठी सुधारणा करण्यात आली आहे.