मायणीत पाऊस आला धावून अन् काही क्षणात रस्ता गेला वाहून

मायणीत पाऊस आला धावून अन् काही क्षणात रस्ता गेला वाहून
Updated on

मायणी (जि. सातारा) : येथील चांद नदीवरील पुलाचे बांधकाम करण्यासाठी तयार करण्यात आलेला तात्पुरता पर्यायी रस्ता अत्यंत निकृष्ट कामामुळे रात्री वाहून गेला. त्यामुळे मायणीतून म्हसवड व पंढरपूरकडे होणारी वाहतूक ठप्प झाली आहे. मल्हारपेठ-पंढरपूर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. पंढरपूर बाजूकडून मायणीपर्यंत काम झाले आहे. 

गावाच्या पूर्वेकडे चांद नदीवर फरशी पुलाच्या जागी नव्याने पूल बांधण्यात येणार आहे. त्या कामासाठी फरशी पुलालगत भराव टाकून तात्पुरता पर्यायी मार्ग तयार करण्यात आला आहे. त्याचे काम अत्यंत निकृष्ट असल्याने दोनच दिवसांपूर्वी त्याचा काही भाग खचला. काही वाहने भरावामध्ये रुतली. आधीच्या फरशी पुलाखाली आठ जलवाहिन्या असताना पर्यायी रस्ता तयार करताना ठेकेदाराने केवळ दोनच जलवाहिन्याचा वापर केला. त्यामुळे मोठा पाऊस होऊन नदीचा प्रवाह वाढल्यास कोणत्याही क्षणी रस्ता वाहून जाण्याची शक्‍यता नागरिक व्यक्त करीत होते. 

बुधवारच्या मुसळधार पावसाने नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह वाढला. पुरेशा जलवाहिन्या नसल्याने भरावालगत मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले. त्याचा जोर वाढून अखेर मध्यरात्री रस्ता वाहून गेला. दरम्यान, पर्यायी रस्ता वाहून गेल्याने पंढरपूर व म्हसवड या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. आता लोकांना कातरखटाव, पिंगळी फाटामार्गे म्हसवड व पुढे पंढरपूरकडे जावे लागणार आहे. कलेढोण, झरे, दिघंची या परिसरातील लोकांना कातरखटाव, पडळ, विखळे फाटामार्गे वाहतूक करावी लागणार आहे. त्यामुळे सातऐवजी सुमारे 27 किलोमीटर अंतर वाढणार आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Eknath Shinde Arrives at Dare Village
Mumbai-Pune Highway Traffic News
Sambhar and Fawn Captured on Camera
Karad flyover Pune Bengaluru highway
Marathi News Esakal
www.esakal.com