ATM robbery : वाईतील एटीएमवर १७ लाखांचा दरोडा; वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Wai News : मंगळवारीच्या पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी कटरच्या साहाय्याने एटीएम मशिन फोडून त्यातील १७ लाख रुपयांची रोकड लंपास केली. घटनेची माहिती मिळताच वाई पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भेट देऊन पंचनामा केला.
वाई शहर : येथील एमआयडीसीतील एटीएम चोरट्यांनी कटरच्या साहाय्याने फोडून १७ लाखांची रोकड लंपास केली. वाईच्या एमआयडीसीतील मुख्य चौकात श्रीनिवास मंगल कार्यालयाशेजारी एटीएम आहे.