
कऱ्हाड : वाठार येथे सहा दिवसांपूर्वी पेट्रोल पंपावर पडलेल्या सशस्त्र दरोडा प्रकरणाचा तपास लावण्यात तालुका पोलिसांना यश आले आहे. पंपावरील कामगाराचाच दरोड्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने चौघांना ताब्यात घेतल्याची माहिती तालुका पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली.