राष्ट्रवादी सोडून गेलेल्यांना शरद पवार निवडणुकीत हिसका दाखवणार; रोहिणी खडसेंचा अजितदादा गटावर निशाणा

सध्या राष्ट्रवादीपुढे भाजपचे आव्हान असून, भाजपनेच पक्ष फोडाफोडीचे राजकारण केले आहे.
Rohini Khadse Criticizes Ajit Pawar Group BJP
Rohini Khadse Criticizes Ajit Pawar Group BJP esakal
Summary

'मी लोकसभेला इच्छुक नाही, मी विधानसभा लढणार असून, माझे तिकीट जयंत पाटील यांनी दोन वर्षांपूर्वीच अंतिम केले आहे.'

सातारा : सध्या राष्ट्रवादीपुढे भाजपचे आव्हान असून, भाजपनेच पक्ष फोडाफोडीचे राजकारण केले आहे. भाजपच्या विचारधारेच्या विरोधात आम्ही लढणार आहोत. जे भाजपसोबत गेलेत ते किती दिवस त्यांच्यासोबत राहतील हे सांगता येत नाही; पण राष्ट्रवादीला सोडून गेलेल्यांना शरद पवार (Sharad Pawar) निवडणुकीत जागा दाखवतील, असा सूचक इशारा राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी येथे पत्रकार परिषदेत दिला.

Rohini Khadse Criticizes Ajit Pawar Group BJP
Loksabha Election : प्रकाश आंबेडकरांचा 'मविआ'तील प्रवेश अद्याप नाही; काँग्रेस प्रभारींचा महत्त्वाचा दावा

राष्ट्रवादी महिला आघाडीच्या मेळावा (NCP Mahila Melava) व संघटन बांधणीसाठी रोहिणी खडसे या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून, आज त्यांनी साताऱ्यात राष्ट्रवादी भवनात पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी जिल्हाध्यक्ष सुनील माने, कविता म्हेत्रे, संगीता साळुंखे, समिंद्रा जाधव, संजना जगदाळे, दीपक पवार, राजकुमार पाटील उपस्थित होते.

रोहिणी खडसे म्हणाल्या, ‘‘संघटन मजबुतीसाठी हा पश्चिम महाराष्ट्र दौरा असून, राष्ट्रवादीला (शरद पवार गट) चांगला प्रतिसाद मिळत आहे. वाढलेल्या महागाईमुळे महिलांमध्ये संतापाचे वातावरण असून, त्या आमच्या राष्ट्रवादीत येऊ लागल्या आहेत. पक्षातील महिला पदाधिकाऱ्यांमधील मतभेदाबाबत विचारले असता, त्या म्हणाल्या, ‘‘आमच्या महिलांत मतभेद नसून मनभेद आहेत. यामुळे महिला व्यक्त होत असून, त्यांच्या भावना समजून येत आहेत. त्याचा आम्हाला आनंद आहे.’’

Rohini Khadse Criticizes Ajit Pawar Group BJP
दुर्गेचं रूप घेवून 'भ्रष्ट जुमला पार्टी'ला सत्तेतून खाली खेचून हिशोब पूर्ण करा; रोहिणी खडसेंचं महिलांना आवाहन

राष्ट्रवादीतील फुटीबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, ‘‘पक्ष फोडणे हे लोकशाहीला घातक आहे. आम्ही विचारधारेच्या विरोधात लढण्यासाठी खंबीर आहोत. सध्या आमच्यापुढे भाजपचे आव्हान असून, त्यांनीच पक्ष फोडाफोडीचे राजकारण केले आहे. त्यांच्या विचारधारेच्या विरोधात आम्ही लढणार आहोत. आज राष्ट्रवादीतून जे भाजपमध्ये गेलेत ते किती दिवस त्यांच्याबरोबर राहतील हे आपल्याला पाहायला मिळेल; पण शरद पवार साहेबांना सोडून गेलेल्यांना साहेब सोडत नाहीत. त्यांना येणाऱ्या निवडणुकीत पाडणारच, असे त्यांनी स्पष्ट केले.’’

साताऱ्यात लोकसभेला किंवा विधानसभेला महिलांना संधी मिळणार का, यावर खडसे म्हणाल्या, ‘‘काँग्रेस आणि राष्ट्रवादीत सर्वाधिक महिला आहेत. गेल्या दहा वर्षांत भाजपच्या काळात सर्वात कमी महिला लोकप्रतिनिधी निवडून गेल्या आहेत. आजपर्यंत पवार साहेबांचा महिलांना पाठिंबा मिळाला आहे. भविष्यातही आम्ही महिलांना जास्तीतजास्त संधी देऊ.’’

Rohini Khadse Criticizes Ajit Pawar Group BJP
Dapoli Police : 'त्या' वादग्रस्त पोस्टमुळे दापोलीत मोठा तणाव; ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात, काय आहे प्रकरण?

राजकारणातील घडामोडी पाहता महिला सुरक्षित आहेत का, या प्रश्नावर त्या म्हणाल्या, ‘‘सध्या राज्यात महिला सुरक्षित नाहीत. पाच ते दहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार होत आहेत. मात्र, दोषींवर तातडीने कारवाई होत नाही. मागील आठवड्यात महिला पोलिसांनीच अधिकाऱ्यांकडून अत्याचार झाल्याची तक्रार केली होती; पण त्यानंतर त्यांना त्यांच्या वक्तव्यापासून माघार घ्यावी लागली होती. महाराष्ट्राला लाजीरवाण्या वाटणाऱ्या या घटना आहेत, की ज्यांच्या हातात सुरक्षा आहे, त्यांच्याकडून दडपशाहीचे राजकारण होत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.’’ भाजपला श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेचा फायदा होईल का, यावर त्या म्हणाल्या, ‘‘याबाबत सांगत येणार नाही; पण श्रीराम हे महाराष्ट्राचे दैवत आहे. तो सर्वांच्या मनात आहे.’’

माझे तिकीट फायनल...

तुम्ही लोकसभेची निवडणूक लढणार का, यावर रोहिणी खडसे म्हणाल्या, ‘‘मी लोकसभेला इच्छुक नाही, मी विधानसभा लढणार असून, माझे तिकीट जयंत पाटील यांनी दोन वर्षांपूर्वीच अंतिम केले आहे. त्यामुळे मी मुक्ताईनगरमधून निवडणूक लढणार आहे.’’

Rohini Khadse Criticizes Ajit Pawar Group BJP
अंगावर गोळ्या झाडल्या तरी, OBC मधूनच मराठ्यांना आरक्षण घेणार; वाघोलीत मनोज जरांगेंचा स्पष्ट इशारा

रोहित पवार यांच्या पाठीशी...

रोहित पवारांवरील ईडी कारवाईबाबत त्या म्हणाल्या, ‘‘अनेक नेत्यांवर ईडीची कारवाई झाली आहे. ज्यांना नोटिशी आल्या आहेत, त्यांनी ईडी कार्यालयात बाजू मांडण्यास बोलावतात. आम्ही सगळे रोहित पवारांच्या पाठीशी असून, प्रत्येकाने त्यांना समर्थन दर्शवले आहे. ही कायदेशीर लढाई आहे, यातून मार्ग निघेल.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com