
सातारा : जिल्हा क्रिकेट संघटना साताऱ्यातील क्रिकेटपटूंसाठी सुसज्ज असे मैदान असावे, यासाठी प्रयत्न करीत आहेत. लिंबखिंड (ता. सातारा) आणि कुशी या दोन ठिकाणी मैदान विकसित करण्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) वतीने सातारा जिल्हा क्रिकेट संघटनेला नुकताच ७५ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. मैदानांच्या विकसनानंतर एमसीएच्या वतीने येथे रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा व्हावी, यासाठी आमचा निश्चित प्रयत्न राहील, अशी ग्वाही एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार यांनी आज दिली.