साताऱ्याच्या राजघराण्यातील शाही सीमोल्लंघन सोहळा रद्द, उदयनराजेंचा निर्णय

बाळकृष्ण मधाळे
Saturday, 24 October 2020

छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस याठिकाणी वर्षानुवर्षे परंपरागत शाही सीमोल्लंघन सोहळा साजरा करण्यात येतो. मात्र, यावर्षी हा सोहळा रद्द करण्याचा निर्णय राजघराण्याच्यावतीने घेण्यात आला आहे.

सातारा : छत्रपती राजघराण्यातील शाही सीमोल्लंघन सोहळा रद्द करण्यात आला आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका विचारात घेऊन छत्रपती उदयनराजे भोसले यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी जलमंदिर येथून भवानी तलवारीच्या पुजनानंतर पोवई नाक्यापर्यंत ही भव्य शाही मिरवणूक जाते. मात्र, यंदा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उदयनराजेंनी ही मिरवणूक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस याठिकाणी वर्षानुवर्षे परंपरागत शाही सीमोल्लंघन सोहळा साजरा करण्यात येतो. मात्र, यावर्षी हा सोहळा रद्द करण्याचा निर्णय राजघराण्याच्यावतीने घेण्यात आला आहे. कोरोनाचा धोका विचारात घेऊन हा निर्णय छत्रपती उदयनराजे भोसले यांनी घेतला आहे.

कास - बामणोली रस्त्यावरील पूलाचे काम लवकरच : उदयनराजे 

दरवर्षी या मिरवणुकीत शाही सोहळ्याला सातारकरांची मोठी गर्दी होत असते. मात्र, यावर्षी भवानी मातेच्या तलवारीचे विधीवत पूजन केले जाणार आहे. जलमंदिर पॅलेस ते पोवई नाकापर्यंत चालणारी भव्य शाही मिरवणूक मात्र रद्द करण्यात आली आहे. छत्रपतींच्या काळापासून ही मिरवणुकीची ही परंपरा आहे. इतक्या वर्षांनी प्रथमच ही परंपरा खंडित होत आहे. दरम्यान, कोल्हापुरातील उद्याचा (25 ऑक्टोबर) शाही दसरा सोहळा देखील रद्द करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Royal Dussehra Of Satara Dynasty Canceled Satara News