'आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका RPI स्वबळावर लढणार'

Municipal Election
Municipal Electionesakal
Summary

नगरपालिका निवडणुका आरपीआय स्वबळावर लढवणार आहे.

कऱ्हाड (सातारा) : जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुका (Municipal Election) आरपीआय स्वबळावर लढवणार आहे. कऱ्हाड पालिका निवडणूकही मूलभूत प्रश्नांवर लढवण्यात येणार असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे Republican Party of India (आंबेडकर गट) राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे (Deepak Nikalje) यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी रिपब्लिकन पार्टीचे राज्याध्यक्ष बाळासाहेब पवार, जिल्हाध्यक्ष दादासाहेब होवाळ, कऱ्हाड दक्षिणचे अध्यक्ष मुकुंद माने, उत्तरचे अध्यक्ष सर्जेराव बनसोडे, युवाध्यक्ष संग्राम पवार, किरण बगडे, अभिजित वाडपे आदी उपस्थित होते. श्री. निकाळजे म्हणाले, ‘‘पक्षाचे माजी अध्यक्ष रामदास आठवले यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यावर २०१९ मध्ये राष्ट्रीय स्तरावर माझी अध्यक्षस्थानी निवड करण्यात आली. दरम्यान, सुमारे दीड-दोन वर्षे कोरोनाच्या कालावधीमध्ये पक्षवाढीचे काम होऊ शकले नाही. परंतु, सध्या ‘गाव तिथे शाखा’ हे अभियान हाती घेण्यात आले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका पक्षाच्या माध्यमातून स्वबळावर लढवण्यात येतील. त्यानुसार राज्यात जिल्हास्तरीय कार्यकर्त्यांचे मेळावे घेण्यात येत आहेत. सातारा जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायती व अन्य स्थानिक निवडणुकाही स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.’’

Municipal Election
बँकेतील पराभवाचा गृहराज्यमंत्री नगरपंचायत निवडणुकीत बदला घेणार?

काँग्रेसचे सरकार (Congress Government) सत्तेवर असताना देशात वर्षातून अपवादात्मक प्रकरणात ईडी आणि सीबीआयच्या चौकशी होत होत्या. मात्र, सध्या भाजपच्या काळात या कारवाया वाढल्या असून, त्यामागे केवळ एकमेकांची दुश्मनी काढण्याचे काम सुरू आहे. महाआघाडीचे सरकारच्या सत्तेत आल्यापासून त्यांच्या कामात विविध प्रकारे अडथळे आणण्याचे केंद्राकडून काम सुरू आहे. यंत्रणांचा वापर करून चौकशा लाऊन सरकारची गळचेपी करण्याचे धोरण अवलंबण्यात आले असल्याचा आरोपही निकाळजे यांनी केला.

Municipal Election
बुरुज अबाधित ठेवून प्रतिष्ठेचा गड जिंकणं NCP, BJP, काँग्रेसमोर मोठं आव्हान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com