दुधाचे दर ढासळत असल्याने शेतकऱ्यांना हातभार लावण्यासाठी अनुदान योजना शासनाने सुरू केली. त्यानुसार गाईच्या दुधाला पाच रुपये अनुदान दिले जात होते. हे अनुदान (Milk Subsidy) जानेवारी २०२४ पासून थकले होते.
सातारा : गेल्या पाच महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेले जिल्ह्यातील ५४ हजार ५० शेतकऱ्यांचे (Farmers) ५१.७१ कोटींचे अनुदान ३१ मार्चअखेर खात्यावर जमा होणार आहे. त्यासाठी नुकतेच शासनाने १५३ कोटी रुपये दूध अनुदानासाठी दुग्धविकास विभागाला उपलब्ध केले आहेत. त्यामुळे हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याने दुग्धोत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.