चर्चाच चर्चा! कऱ्हाड बस स्थानकावर अकरा तारखेचीच चर्चा

सचिन शिंदे
Tuesday, 12 January 2021

सातारा बॉंब शोध व नाशक पथकाचे अधिकारी, कर्मचारी त्यांच्या रूद्रा श्वान पथकासह कराडला आले. त्यांनी घटनास्थळी येऊन बेवारस बॅग ताब्यात घेतली. 

कऱ्हाड : मागील महिन्याच्या 11 डिसेंबरला येथील बस स्थानकासमोर एक बेवारस बॅग आढळली होती. तशीच एक बॅग पुन्हा महिन्याने बरोबर 11 जानेवारीलाच त्याच तारखेला बेवारस स्थितीत आढळली आहे. त्यामुळे नागरिकांत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, बॉंब शोध व नाशक पथकाने ती बॅग तपासली. मात्र, त्यात कपडे व अन्य काही साहित्य आढळल्याने पोलिसांसह नागरिकांनी सुटकेचा श्वास टाकला.
 
येथील बस स्थानक समोरील एका मेडिकलसमोर बरोबर 11 डिसेंबरला एक बेवारस बॅग आढळली होती. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. त्यानंतर आजच्याच 11 जानेवारीला त्याच ठिकाणी प्रवासी बेवारस बॅग आढळली. त्यामुळे नागरिकांत खळबळ उडाली. बॉंब शोधक व नाशक पथकाला बालविण्यात आले. त्यांनी मोकळ्या व निर्जनस्थळी बॅग नेऊन बेवारस बॅग तपासली. त्यात काहीच संशयास्पद आढळले नाही. बॅगेत कपडे, संसारोपयोगी साहित्य आढळले. त्यामुळे पोलिस व नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. 

सामूहिक बलात्काराची खोटी तक्रार महिलेच्या अंगलट; न्यायालयाने शिकवली अद्दल!  

दरम्यान महिन्याने तीच तारीख गाठून बस स्थानकासमोरील त्याच ठिकाणी मोठी बॅग सापडल्याने अकरा तारखेची चर्चा होती. फूटपाथ लगतच्या गेटजवळ दुपारपासून ती बॅग होती. त्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. सकाळी एका व्यक्तीने बॅग ठेवल्याचे काहींनी सांगितले. सायंकाळी सातारा बॉंब शोध व नाशक पथकाचे अधिकारी, कर्मचारी त्यांच्या रूद्रा श्वान पथकासह येथे आले. त्यांनी घटनास्थळी येऊन बेवारस बॅग ताब्यात घेतली. ती निर्जनस्थळी नेऊन तपासली. त्या वेळी त्या बॅगेत संशयास्पद काहीही आढळले नाही. त्या उलट बॅगेत संसारोपयोगी साहित्यासह कपडे होते.

सातारकरांनाे! बिनधास्त खा अंडी, चिकन; कुक्कुटपालकांसह पशुसंवर्धन दक्ष

भाविकांनाे! पुसेगावात तीन दिवस जमावबंदी, संचारबंदी लागू 

Edited By : Siddharth Latkar

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rumour Spread In Karad About Bag Of Bus Stand Satara Marathi News