

Devotion Peaks at Taradgaon: First Standing Ringan of Sant Dnyaneshwar Palkhi Draws Lakhs of Warkaris
sakal
-अमोल काकडे
तरडगाव : टाळ मृदुंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष सुरू असतानाच माउलींचा व स्वाराचा असे दोन्ही अश्व एकामागून एक दौडले आणि माउली.. माउली.. नावाचा जयघोष सुरू झाला. अशा भक्तिपूर्ण वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरी माउलींच्या पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण चांदोबाचा लिंब, तरडगाव येथे परंपरागत पद्धतीने मोठ्या उत्साहात झाले. यावेळी लाखो भाविकांची उपस्थिती होती. रिंगणानंतर सायंकाळी पालखी सोहळा तरडगाव मुक्कामी विसावला.