झोपडपट्टी हटवा अन्यथा रस्त्याचे काम बंद पाडू; शंकर माळवदेंचा सातारा पालिकेस इशारा

झोपडपट्टी हटवा अन्यथा रस्त्याचे काम बंद पाडू; शंकर माळवदेंचा सातारा पालिकेस इशारा
Updated on

सातारा : जिल्हा परिषद चौक ते सदरबझार कॅनॉल रस्ताच्या डांबरीकरणात झोपडपट्टीचा अडथळा येत आहे. या मार्गावर असणारी झोपडपट्टी हटविण्याविषयी पालिका कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याने रस्त्याचे काम रखडण्याची चिन्हे आहेत. झोपडपट्टीत राहणाऱ्यांचे गृहप्रकल्पात पुनर्वसन झाल्यानंतर त्याठिकाणी दुसऱ्यांनी घुसखोरी केल्याच्या तक्रारीही काही नागरिकांनी आज पालिका पदाधिकाऱ्यांसमोर मांडल्या.
 
सातारा पालिकेने जिल्हा परिषद चौकातून सदरबझारकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्ती आणि रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी सुमारे दीड कोटी खर्च अपेक्षित आहे. या कामाची नगराध्यक्षा माधवी कदम, बांधकाम सभापती मिलिंद काकडे, "साविआ'चे पक्ष प्रतोद निशांत पाटील यांनी पाहणी केली. त्या वेळी रस्त्याचे काम सदरबझारमधील भीमाबाई आंबेडकर झोपडपट्टीजवळ रखडल्याचे लक्षात आले. त्याठिकाणी माजी उपाध्यक्ष शंकर माळवदे यांनी भूमिका मांडली. झोपडपट्टीच्या जागेवर पालिकेन बागेचे आरक्षण टाकले आहे. त्याठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना पालिकेच्या गृह प्रकल्पात सदनिका दिल्या आहेत. सोडलेल्या जागेत दुसऱ्यांनी घुसखोरी करत जागा बळकावल्या आहेत. ही झोपडपट्टी हटविल्याशिवाय रस्त्याचे काम करू देणार नसल्याचेही माळवदे यांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षणाबाबत अभ्यासाचा प्रश्न येतोच कुठे; उदयनराजेंचा भुजबळांवर जोरदार पलटवार 

यापूर्वी पालिकेच्या वतीने झोपड्या हटविण्यासाठी कर्मचारी पाठविण्यात आले, मात्र उपयोग झाला नाही. सलग दोन वेळा कारवाई टाळत पालिका कोणाची पाठराखण करत आहे, असा सवालही माळवदेंनी केला. या प्रश्‍नांना नगराध्यक्षांनी उत्तर देत त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com