
मसूर : सह्याद्री कारखान्याच्या नवीन विस्तारित प्रकल्पाच्या बॉयलर व चिमणीमध्ये बसविण्यात येणाऱ्या ईएसपी यंत्रणेत धूर साचून राहिल्याने स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजाने पळताना तिघांना दुखापत झाली. या घटनेची नोंद तळबीड पोलिसात झाली आहे. त्याबाबत सरव्यवस्थापक प्रदीप यादव यांनी त्याची खबर दिल्याचे पोलिसांनी सांगितले.