
- संदीप पारवे
मसूर : ज्येष्ठ नेते (कै.) यशवंतराव चव्हाण यांनी सह्याद्री कारखान्याची जबाबदारी (कै.) पी. डी. पाटील यांच्यावर सोपवली. त्यानंतर माझ्यासह सर्व संचालक मंडळांनी सभासदांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता काम केले. कारखाना सामान्य सभासद शेतकऱ्यांच्या मालकीचाच असून, त्याचा कधीही राजकारणासाठी उपयोग केला नाही. त्यामुळे इतरांनी सह्याद्रीकडे राजकारण म्हणून पाहू नये, असा इशारा कारखान्याचे अध्यक्ष माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिला.