Karad News : मानसिंगराव जगदाळे, निवास थोरात यांच्या हरकतीवर प्रादेशिक साखर सहसंचालकांसमोर सुनावणी पूर्ण; निकाल ठेवला राखून

सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीसाठी दाखल २५१ उमेदवारी अर्जांची छाननी निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाली.
sahyadri sugar factory
sahyadri sugar factorysakal
Updated on

कऱ्हाड - यशवंतनगर (ता. कऱ्हाड) येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांपैकी मानसिंगराव जगदाळे आणि निवासराव थोरात या दोघांचे अर्ज बाद झाल्याचा निकाल निवडणुक निर्णय अधिकारी संजयकुमार सुद्रीक यांनी दिला होता.

त्यावर संबंधित दोघांसह १० जणांनी प्रादेशिक साखर सहसंचालक यांच्याकडे अपील करुन दाद मागीतली होती. त्यावर आज साखर आयुक्तालयात सुनावनी झाली. त्यात श्री. जगदाळे आणि श्री. थोरात या दोघांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर प्रादेशिक साखर सहसंचालकांनी निकाल राखून ठेवला आहे. त्यामुळे त्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीसाठी दाखल २५१ उमेदवारी अर्जांची छाननी निवडणुक निर्णय अधिकारी सुद्रीक, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी अपर्णा यादव, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक राहूल देशमुख, सहाय्यक निबंधक (प्रशासन) संजय जाधव यांच्या उपस्थितीत झाली.

दाखल २५१ उमेदवारी अर्जापैकी २०५ उमेदवारांचे २१८ अर्ज वैध ठरले आणि २९ उमेदवारांचे ३३ अर्ज अवैध ठरले. उमेदवार अर्जांची छाननी सुरु असताना मुरलीधर गायकवाड यांनी निवास थोरात यांच्या अर्जावर तर वसंतराव जगदाळे यांनी मानसिंगराव जगदाळे यांच्या अर्जावर हरकत घेतली. त्याची सुनावनी निवडणुक निर्णय अधिकारी श्री. सुद्रीक यांच्यासमोर झाली.

त्यामध्ये निवडणुक निर्णय अधिकारी यांनी श्री. थोरात व श्री. जगदाळे यांचे दोन्ही अर्ज बाद झाल्याचा निकाल दिला. त्यानंतर संबंधित दोघांनीही निवडणुक निर्णय़ अधिकारी यांच्या निकालावर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम १५२ अ अन्वये प्रादेशिक सहसंचालक (साखर), पुणे विभाग यांच्याकडे अपील दाखल केले. त्याची सुनावनी आज साखर आयुक्तालयात प्रादेशीक साखर सहसंचालक निलीमा गायकवाड यांच्या समोर झाली.

संबंधित दोन्ही अपिलार्थी यांच्या वकिलांनी आपली बाजू मांडली. त्यांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर आज सायंकाळी निकाल मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र प्रादेशिक साखर सहसंचालकांनी निकाल दाखवून ठेवला आहे. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com