लाईव्ह न्यूज

Sahyadri Sugar Factoyr Election : निवास थोरातांचा अर्ज वैध, मानसिंगराव जगदाळेचां अर्ज बाद

सह्याद्रीच्या निवडणुकीत विरोधकांना दिलासा, सत्ताधाऱ्यांना धक्का.
Sahyadri Sugar Factory
Sahyadri Sugar Factorysakal
Updated on: 

कऱ्हाड - यशवंतनगर (ता. कऱ्हाड) येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या २५१ अर्जांची छाननी झाली. त्यातील २९ उमेदवारी अर्ज बाद झाले तर २०५ उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. दाखल अर्जापैकी मानसिंगराव जगदाळे आणि निवासराव थोरात या दोघांच्या अर्जावर हरकत घेण्यात आली होती.

त्यावरील निकाल निवडणुक निर्णय अधिकारी संजयकुमार सुद्रीक यांनी देत दोघांचेही अर्ज छाननीत बाद केले. त्यामुळे संबंधितांसह १० जणांनी प्रादेशिक साखर सहसंचालक निलीमा गायकवाड यांच्याकडे अपिल दाखल केले होते.

त्याचा निकाल आज जाहीर झाला असुन निवास थोरात यांच्यासह संबंधित नऊ जणांचे अर्ज वैध ठरले असुन मानसिंगराव जगदाळे यांचा अर्ज अवैध ठरवला आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना धक्का बसला असुन विरोधी गटाला दिलासा मिळाला आहे.

सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीसाठी २५१ उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्याची छाननी निवडणुक निर्णय अधिकारी संजयकुमार सुद्रीक, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी अपर्णा यादव, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक राहूल देशमुख, सहाय्यक निबंधक (प्रशासन) संजय जाधव यांच्या उपस्थितीत झाली.

छाननीत २३४ उमेदवारांच्या दाखल २५१ उमेदवारी अर्जापैकी २०५ उमेदवारांचे २१८ अर्ज वैध ठरले तर २९ उमेदवारांचे ३३ अर्ज अवैध ठरले. अवैध ठरलेल्या २९ पैकी २६ उमेदवारांचे अर्ज त्यांनी मागील पाच ऊस गळीत हंगामापैकी किमान तीन हंगामात कारखान्याला ऊस घातला नसल्याने अवैध ठरले आहेत.

एक अर्ज उमेदवाराकडे सहकारी बँकेची थकबाकी असल्याने एक अर्ज कलम ८८ अन्वये जबाबदारी निश्चित झालेने व एका उमेदवाराच्या अर्जावर सूचकाचा तपशील नसल्याने व अनुमोदक नसल्याने सदर अर्ज अवैध ठरले आहेत. त्यामुळे छाननी नंतर २०५ उमेदवार शिल्लक राहिले होते.

उमेदवार अर्जांची छाननी सुरु असताना मुरलीधर गायकवाड यांनी निवास थोरात यांच्या अर्जावर तर वसंतराव जगदाळे यांनी मानसिंगराव जगदाळे यांच्या अर्जावर हरकत घेतली होती. त्याची सुनावनी निवडणुक निर्णय अधिकारी सुद्रीक यांच्यासमोर झाली. त्यामध्ये निवडणुक निर्णय अधिकारी यांनी श्री. थोरात व श्री. जगदाळे यांचे दोन्ही अर्ज बाद झाल्याचा निकाल दिला होता.

त्यावर प्रादेशिक साखर सहसंचालक श्रीमती गायकवाड यांच्याकडे संबंधितांनी अपिल दाखल केले होते. त्यावर शुक्रवारी सुनावनी झाली. त्याचा निकाल आज जाहीर करण्यात आला. त्यामध्ये अपिल दाखल झालेल्या १० पैकी निवास थोरात यांच्यासह नऊ जणांचे अर्ज वैध ठरले तर मानसिंगराव जगदाळे यांचा अर्ज अवैध ठरला आहे. त्यामुळे सत्ताधारी गटाला धक्का बसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com