Sahyadri Sugar Factory Election : नेत्यांची प्रतिष्ठाच ठरली विरोधकांतील फुटीचे मूळ

राजकीय घडामोडीतून विरोधकांनी सत्ताधारी गटाशी भांडण्याऐवजी विरोधकच एकमेकांशी भांडत असल्याचे दिसून आले.
Sahyadri Sugar Factory
Sahyadri Sugar Factorysakal
Updated on

- हेमंत पवार

कऱ्हाड - सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक यंदा वेगवेगळ्या कारणांनी गाजत आहे. यावेळी कारखान्यातील सत्ताधारी माजी मंत्री बाळासाहेब पाटील गटाला शह देण्यासाठी विरोधी काँग्रेस, भाजपसह सर्व पक्षीय नेते गेल्या सहा महिन्यांपासून एकवटले होते. मात्र, शेवटच्या टप्यात एकमेकांच्या प्रतिष्ठेवरूनच या नेत्यांत फूट पडल्याचे आज चिन्ह वाटपादरम्यान दिसून आले. कारखान्यात सत्ता मिळविण्याचा चंग बांधलेल्या विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना टार्गेट करण्यापेक्षा एकमेकांनाच टार्गेट केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सह्याद्रीची निवडणूक एकसंधपणे लढण्याची विरोधकांनी गेल्या सहा महिन्यांपासून केलेल्या तयारीवरच पाणी फेरल्याचे दिसून आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com