Dasnavami festival : सज्जनगडावर दासनवमी उत्सव बहरला; अकरा दिवस विविध धार्मिक कार्यक्रम
Satara Sajjangad : समर्थांच्या निर्याण दिनी दासनवमी उत्सव साजरा केला जातो. त्यानिमित्त सज्जनगडवर अकरा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. श्री रामदास स्वामी संस्थानच्या वतीने अध्यक्ष भूषण स्वामी आणि बाळासाहेब स्वामी यांनी उत्सवाची माहिती दिली.
Devotees gather at Sajjangad for the 11-day Dasnavami festival, participating in a variety of spiritual and religious activities.Sakal
सातारा : समर्थांच्या समाधीची महापूजा, आरती, छबिना अन् श्रीराम मंदिराला लयीत घातल्या जाणाऱ्या १३ मंदिर प्रदक्षिणा असा धार्मिक कार्यक्रमांत दररोज शेकडो भाविक सहभागी होत असून, सज्जनगड येथील दासनवमी उत्सव बहरून गेला आहे.