भोजन, निवासाविना सज्जनगड खुला; रामदास स्वामी संस्थानचा महत्वपूर्ण निर्णय

दिलीपकुमार चिंचकर
Friday, 20 November 2020

मंदिरे खुली होताच सज्जनगड येथे भाविक येऊ लागले आहेत. अगदी पुणे, कोल्हापूर आणि मराठवाड्यातूनही भाविक गडावर आले आहेत. थंडीमुळे गडावरील वातावरणही आल्हाददायक आहे. त्यामुळे गर्दी वाढण्याची शक्‍यता आहे.

सातारा : मंदिरे खुली करण्याचा निर्णय शासनाने घेताच सज्जनगडावर भाविक, पर्यटकांची गर्दी वाढू लागली असून, या शासनाच्या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले आहे. दरम्यान, सज्जनगड भाविकांसाठी खुला झाला असला, तरीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना सध्या तेथे राहता येणार नाही, तसेच भाविकांना प्रसाद भोजनाऐवजी द्रोणातून खीर आणि डाळ-तांदळाची खिचडी प्रसाद म्हणून देण्याचा निर्णय रामदास स्वामी संस्थानच्या वतीने घेण्यात आल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब स्वामी यांनी दिली. 

बाळूमामाच्या रुपात सिध्दनाथाला पाहून, भाविक गेले आनंदून!

मंदिरे खुली होताच सज्जनगड येथे भाविक येऊ लागले आहेत. अगदी पुणे, कोल्हापूर आणि मराठवाड्यातूनही भाविक गडावर आले आहेत. थंडीमुळे गडावरील वातावरणही आल्हाददायक आहे. त्यामुळे गर्दी वाढण्याची शक्‍यता आहे. कोरोना काहीसा कमी झाला आहे; पण पूर्ण संपलेला नाही, तसेच गडावरील सर्व खोल्या, व्यवस्था बंद होती. त्याची स्वच्छता करावयाची असल्याने निवास व्यवस्था काही काळ बंद ठेवली जाणार आहे. भोजन व्यवस्था सुरू ठेवल्यास सुरक्षित अंतर ठेवणे शक्‍य होणार नाही. म्हणून भाविकांना फक्त द्रोणातून खीर -खिचडीचा प्रसाद दिला जाणार आहे. एकूणच सज्जनगड खुला केल्याबद्दल भाविकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sajjangad In Satara Open To Devotees Satara News