पाणी बचतीत तनिष्‍कांचा सहभाग कौतुकास्‍पद

रमेश काळे; मालुसरेवाडी येथे सकाळ रिलीफ फंडातून बंधाऱ्यातील गाळ काढण्याचा प्रारंभ
sakal relief fund water scheme to saygaon water conservation
sakal relief fund water scheme to saygaon water conservationsakal

सायगाव : पाणी बचतीचे महत्त्व लक्षात घेऊन दैनिक ‘सकाळ’ने उचललेले पाऊल खऱ्या अर्थाने पाण्याचा जलस्रोत वाढविण्‍याच्या दृष्टिने खूप चांगले असून, या कामात तनिष्का व्यासपीठातील महिलांचा असलेला सहभाग कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्‍गार जावळी तालुका गटविकास अधिकारी रमेश काळे यांनी काढले. मालुसरेवाडी (ता. जावळी) येथे सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून बंधाऱ्यातील गाळ काढणी कामाच्या उद्‍घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

याप्रसंगी विस्तार अधिकारी नारायण म्हासाळ, ग्रामसेवक समाधान जाधव, सकाळचे बातमीदार प्रशांत गुजर, सरपंच राजेंद्र तोडरमल, उपसरपंच यशवंत महामुलकर, ग्रामपंचायत सदस्य माधवी महामुलकर, तनिष्का गटप्रमुख वैशाली निकम, सविता काकडे, बाबासाहेब साळेकर, उत्तम मालुसरे, दुर्गास साळेकर, अमोल काकडे, संजय निकम, गुलाबराव निकम, अंकुश मालुसरे, भरत मालुसरे, संपत मालुसरे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना काळे म्हणाले, ‘‘पाणी बचत ही काळाची गरज आहे.

जलसंधारण कामासाठी प्रत्येक ग्रामस्थांनीही आपला सहभाग द्यावा व सकाळ माध्यम समूहाला सहकार्य करावे म्हणजे भविष्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही.’’याप्रसंगी मोना मालुसरे, प्रतीक्षा इंगुळकर, शालन मालुसरे, ताराबाई मालुसरे, रूपाली मालुसरे, मीना मालुसरे, सुशीला मालुसरे, वैशाली साळेकर, पल्लवी महामुलकर, सुनीता साळेकर, मंगल निकम, रेखा निकम, यांच्यासह हणमंत महामुलकर, तुकाराम साळेकर, सुनील नवले आदी ग्रामस्थ उपस्थित होते. बाबा साळेकर यांनी सूत्रसंचालन केले तर अमोल काकडे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com