
सातारा : येथील पोवई नाक्यावरील शिवतीर्थावर प्री आणि पोस्ट वेडिंग शूट, फोटो शूटसारख्या चित्रीकरणास बंदी घालावी. शिवतीर्थाचे पावित्र्य अबाधित राखावे, अशी मागणी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गा वाहिनीचे पदाधिकारी, मनसे, तसेच शिवभक्त यांनी निवेदनाद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्याकडे केली आहे. प्रशासनाने येथील अशा प्रकारांना वेळीच पायबंद घालावा. अन्यथा त्याचे तीव्र पडसाद उमटतील, असा इशारा शिवभक्तांनी दिला आहे.