पुसेगाव, काटकरवाडी परिसरात वाळू चोरट्यांचा धुमाकूळ, पोलिस-महसूलचे दुर्लक्ष

पुसेगाव, काटकरवाडी परिसरात वाळू चोरट्यांचा धुमाकूळ, पोलिस-महसूलचे दुर्लक्ष
Updated on

विसापूर (जि. सातारा) : कोरोनासोबत सुरू असलेल्या अदृश्‍य जैविक महायुद्धात अत्यावश्‍यक सेवा देणारे पोलिस व महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी व्यस्त असल्याचा लाभ घेत खटाव तालुक्‍यातील पुसेगाव, काटकरवाडी परिसरात वाळू चोर सक्रिय झाले आहेत. मागील महिन्यात अतिवृष्टीने येरळा नदीला आलेल्या पुराचे पाणी ओसरताच या परिसरातील येरळा नदी पात्रातून अवैध वाळूउपसा सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. 

खटाव तालुक्‍यातील कोरोना रुग्णांची कमी झालेली संख्या पुन्हा वाढत चालली असून, कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी रात्रंदिवस कामात व्यस्त आहेत. त्यातच, नूतन तहसीलदारांनी काही दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारला असून, ते कोरोनासह अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, पिकांचे पंचनामे व येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या कामांमध्ये व्यस्त आहेत. याचाच फायदा काही वाळू उपसा करणारे घेत असल्याचे दिसून येत आहे. अशीच परिस्थिती राहिली तर शेकडो ब्रास वाळू उपसा होऊन येरळा नदीपात्राला वाळवंट बनण्यास वेळ लागणार नाही. 

पुढील अनेक दिवस येथील महसूल व पोलिस प्रशासन कोरोना संसर्ग रोखण्याच्या, तसेच ग्रामपंचायत निवडणुकीच्या कार्यामध्ये व्यस्त राहण्याची शक्‍यता आहे. यामुळे येथील वाळूमाफियांवर नूतन तहसीलदार कारवाई करणार की नाही, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. बेसुमार वाळू उपशाने येरळा नदी पात्रासह पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असल्याने संबंधित विभागाने यात लक्ष घालून अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्यांवर ठोस कारवाई करण्याची मागणी नदीकाठच्या शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

येरळा नदीला पाणी सुरू असल्यामुळे वाळू उपसा बंदच होता. तत्पूर्वीही वाळूचा उपसा नव्हता. मात्र, या एक ते दोन दिवसांत वाळू उपसा सुरू झाला असल्यास तातडीने कारवाई करण्यात येईल. 
- आर. डी. शिंदे, तलाठी, कटगुण 

नदीपात्रातून वाळूचा अमर्याद उपसा होत असल्याने नदी पात्रात मोठे खड्डे पडत आहेत. नदीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता यातून कमी होत चालली आहे. यामुळे नदीकाठच्या विहिरींचे पाणी लवकर आटत असून, नदीकाठच्या शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. 
- प्रकाश जाधव, शेतकरी, पुसेगाव 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satara Youth Pratik Kalbhor Dies After 46 Days Following Serious Bengaluru Highway Accident During Medical Treatment
Satara Native Celebrates Ganesh Festival in Nigeria Lagos for 16 Years Keeping Marathi Culture and Ganpati Tradition Alive
Rain Deficit Damages Kharif Crops in Satara Man Khatav and Other Talukas Look to Crop Insurance for Compensation
Farmer Loss Assessment
Marathi News Esakal
www.esakal.com