बाबो! हे आता अतिच झालं की.. पुसेसावळीत चक्क गाढवांवरून वाळू तस्करी, महसूलचा कानाडोळा

बाबो! हे आता अतिच झालं की.. पुसेसावळीत चक्क गाढवांवरून वाळू तस्करी, महसूलचा कानाडोळा
Updated on

पुसेसावळी (जि. सातारा) : गेल्या अनेक दिवसांपासून येथील परिसरात दिवसाढवळ्या गाढवांचा वापर करून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरू आहे. नांदनी नदी व इतर छोट्या-मोठ्या ओढ्यांवरून धनदांडग्या लोकांनी गाढव मालकांच्या साह्याने गाढवांचा वापर करून दिवसाला हजारो रुपये कमावण्यासाठी हा व्यवसाय सुरू केला आहे. वाळूउपसा करणारे गाढवमालक त्यांच्या लहान मुलांना यात पुढे करत आहेत. याबाबत महसूल प्रशासनाने कानाडोळा केलेला असून, पोलिस प्रशासनाने गांधारीची भूमिका घेतली आहे. 

ग्रामीण भागातून गाढव नावाचा प्राणी नामशेष होत असताना सध्याच्या कोरोना आणि लॉकडाउन काळात याच गाढवांना ग्रामीण भागात मोठा भाव आला आहे. पूर्वी ग्रामीण भागात सर्रास गाढव हा प्राणी मोठ्या प्रमाणात आढळून येत होता. 20 वर्षांपूर्वी गावाच्या आजूबाजूला दिसणारी गाढवे काळाच्या ओघात कुठेही दिसेनाशी झाली आणि त्यांच्यावर उदरनिर्वाह करणारी कुटुंबे रोजगार आणि इतर व्यवसाय करून पोट भरू लागली. मात्र, मार्च महिन्यात कोरोना साथीचा प्रादुर्भाव सुरू झाला आणि गाढवांना सोन्याचे दिवस आले असेच म्हणावे लागेल. लॉकडाउनमुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले, नोकऱ्या गेल्या, व्यवसायही थांबले. मात्र, गाढवमालकांची मात्र चांदी सुरू झाली हो चक्क चांदी... दिवसाला पाच ते सात हजार रुपये मिळवून देणारी गाढवे विकत घेण्यासाठी चक्क चढाओढ सुरू झाली आणि सात-आठ गाढवे घेऊन नवीन व्यवसाय सुरू झाला. 

पुसेसावळी परिसरात गाढवांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी होत असून, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. कोरोना साथीच्या नियंत्रणात सर्व प्रशासन मोठ्या विश्वासाने झटत असताना दुसरीकडे गाढवांचा वापर करून मोठ्या प्रमाणात वाळू माफियांची टोळी ग्रामीण भागात निर्माण झाली आहे. दिवसाला गाढव हजारो रुपये कमाई करून देत असल्याने आता ग्रामीण भागात एका विशिष्ट समाजाच्या लोकांना हाताशी धरून हा व्यवसाय गावातीलच धनदांडगे लोक करू लागले आहेत. याकडे सध्या प्रशासनाची डोळेझाक झाली आहे की काय, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. 

पुसेसावळी व परिसरात गाढवांच्या माध्यमातून वाळूउपसा होत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. याबाबत आमच्या वरिष्ठांशी चर्चा करून अशा लोकांवर कोणती कारवाई करता येईल, याबद्दल चर्चा सुरू आहे. 
-धनंजय भोसले, मंडलाधिकारी, पुसेसावळी 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Javali Mourns Brave Soldier Tushar Bhilare; Family Left Devastated
Decades-Old Rehabilitation Issue Nears Resolution for 29 Dhom Dam Villages in Satara
Satara Leads by Example as Farmers Produce 25,482 Quintals of Soybean Seeds
UNESCO Kas Plateau flower blooming season
Marathi News Esakal
www.esakal.com