कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात सांगलीचा दुचाकीस्वार ठार

तानाजी पवार
Sunday, 29 November 2020

कुत्र्याला वाचविण्यासाठी केलेले प्रयत्न असफल ठरले आणि राेकडे हे स्वतःही मृत्यूमुखी पडल्याची चर्चा परिसरात हाेती.

वहागाव (जि. सातारा) : पुणे- बंगळूर महामार्गावर बेलवडे हवेली (ता. कऱ्हाड) गावचे हद्दीत दुचाकीला कुत्र्याची धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाल्याची घटना घडली. हा अपघात हाेताच परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आले.
 
गौतम सीताराम रोकडे (वय 66 सध्या, रा. तासवडे एमआयडीसी ता. कऱ्हाड, मूळ रा. उपळावी, सांगली) असे जागीच ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार, तासवडे औद्योगिक वसाहतीतून गौतम रोकडे हे दुचाकी (एमएच 10 बीएन - 883) वरून कऱ्हाडकडे येत असताना बेलवडे हवेली गावच्या हद्दीतून आले असता अचानक दुचाकीला कुत्र्याची जोराची धडक बसली.
कऱ्हाड : पोस्ट कोविड तपासणी सेंटरची गरज

यामध्ये रोकडे गंभीररीत्या जखमी होऊन जागीच ठार झाले. या अपघातात कुत्रेही मृत्युमुखी पडले. घटनेची नोंद तळबीड पोलिसांत झाली आहे. दरम्यान राेकडे यांनी कुत्र्याला वाचविण्यासाठी केलेले प्रयत्न असफल ठरले आणि स्वतःही मृत्यूमुखी पडल्याची चर्चा परिसरात हाेती.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli Citizen Died On Pune Banglore National Highway Satara News