Sangli Drought: सांगली जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा तीव्र; दुष्काळी तालुक्यांतील पाणीसाठा घटला, टँकरची संख्या वाढवावी लागणार

Sangli Drought, Water Shortage in 40 Villages as Reservoir Levels Fall : सांगली जिल्ह्यातील ८३ तलावांमध्ये केवळ ३० टक्के पाणीसाठा शिल्लक असून, गतवर्षीच्या तुलनेत मोठी घट झाली आहे. जत, खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि तासगाव या दुष्काळी तालुक्यांमध्ये पाणीटंचाई तीव्र होत आहे.
Sangli Faces Intensifying Drought as Reservoir Water Levels Drop and 37 Tankers Supply Affected Villages

Sangli Faces Intensifying Drought as Reservoir Water Levels Drop and 37 Tankers Supply Affected Villages

esakal

Updated on: 

सांगली: ‘एल निनो’च्या संभाव्य प्रभावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत. जिल्ह्यातील ८३ तलावांमध्ये अवघा ३० टक्के पाणीसाठा शिल्लक असून, गतवर्षीच्या तुलनेत त्यात तब्बल ६५ टक्क्यांची घट झाली आहे. परिणामी, सध्या ४० गावे आणि २८५ वाड्यांना ३७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परतीचा पाऊसही पुरेसा न झाल्याने आगामी काळात पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

यंदा ‘एल निनो’चा प्रभाव जाणवण्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तवला होता. मात्र, जुलैमध्ये झालेल्या पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली. ऑगस्टपासून पावसाने पाठ फिरवल्याने परिस्थिती बदलली आहे. धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असला, तरी दुष्काळी तालुक्यांतील टंचाईची तीव्रता लक्षात घेऊन पाण्याचे नियोजन करावे लागत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com