Koyna Dam
esakal
हेमंत पवार
कराड : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने गेल्या आठवड्यापासून पूर्णपणे उघडीप दिली आहे. त्यामुळे धरणातील पाणी पातळी स्थिर असून धरणात सध्या 104.06 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. सातारा व सांगली जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्याने सध्या खरीप हंगामातील पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. सांगली पाटबंधारे विभागाने केलेल्या मागणीनुसार कोयना धरणाच्या पायथा वीज गृहातून आज रविवारी सकाळी आठ वाजता 1 हजार 50 क्यूसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.