

Protesting remarks on farmers and demanding a public apology.
Sakal
कऱ्हाड : शेतकऱ्यांबाबत आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ कऱ्हाडमध्ये युवक काँग्रेसने आक्रमक आंदोलन केले. आंदोलनासाठी आणलेल्या आमदार गायकवाड यांच्या पुतळ्याला मांसाचे तुकडे अडकवण्यात आले होते. भर चौकात त्या पुतळ्याचे कुत्र्यांनी लचके तोडल्याने आंदोलनातील प्रसंग लक्षवेधी ठरला.