एनडीआरएफचे पथक "या' शहरात दाखल

karad
karad
Updated on: 

कऱ्हाड (जि. सातारा) ः संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर कऱ्हाड- पाटण तालुक्‍यासाठी एनडीआरएफ जवानांचे पथक आज येथे दाखल झाले. एक अधिकारी आणि 21 जवान या पथकात असून, पूरस्थितीत दोन्ही तालुक्‍यांत हे पथक मदतीसाठी तत्पर असणार आहे. ऑगस्ट अखेरदरम्यान हे पथक येथे कार्यरत असणार असून, दोन्ही तालुक्‍यांतील पूरग्रस्त गावांत आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक दाखवून जवान तरुणांचे प्रशिक्षणही घेणार आहेत. 

आपत्ती काळात मदतकार्यासाठी एनडीआरएफचे एक अधिकारी आणि 21 जवानांचे एक पथक आज येथे दाखल झाले. त्यांच्यामार्फत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण देण्यात येणार असून, पूरग्रस्त गावातील तरुणांनाही त्यामध्ये सहभागी करून घेतले जाणार आहे. लॉकडाउनचा कालावधी संपल्यानंतर प्रशिक्षणास सुरुवात करण्यात येणार आहे. येथील कृष्णा- कोयनेच्या प्रीतिसंगमावर आपत्ती व्यवस्थापनाचे आज प्रशिक्षण घेण्यात आले. त्या वेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ताम्हाणे, एनडीआरएफचे अधिकारी सचिन नलवडे, तहसीलदार वाकडे, मंडल अधिकारी महेश पाटील, तलाठी संजय जंगम यांच्यासह पालिका, पोलिस यांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

तहसीलदार वाकडे म्हणाले, ""पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या विशेष प्रयत्नातून कऱ्हाड व पाटण तालुक्‍यांसाठी एनडीआरएफचे पथक आज येथे दाखल झाले आहे. संभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पालिका आपत्ती व्यवस्थापनच्या कर्मचाऱ्यांना बचावासाठीचे व बोट चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले'' 

एनडीआरएफचे अधिकारी नलवडे यांनी कऱ्हाड व पाटण तालुक्‍यांतील पूरग्रस्त गावात जाऊन ग्रामस्थांना पुरामध्ये स्वतःचा बचाव कसा करावा, तसेच संकटातील व्यक्तीला आपण कसे वाचवू शकतो, याचे प्रशिक्षण दिले जाईल, असे सांगितले. 

(संपादन ः संजय साळुंखे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sangli District Bank Election
Panchayat Samiti members discuss drought conditions and irrigation issues in Walwa taluka
Khambatki Ghat Traffic Jam on Pune-Satara Highway
Satara Munawale Water Tourism Centre Reopens With Adventure Sports And Modern Freshwater Tourism Facilities
Marathi News Esakal
www.esakal.com