गटातटांचे राजकारण बाजूला ठेऊन गावच्या विकासासाठीच एकत्र : काटवटे

गटातटांचे राजकारण बाजूला ठेऊन गावच्या विकासासाठीच एकत्र : काटवटे
Updated on

ओगलेवाडी (जि. सातारा) : हजारमाची (ता. कऱ्हाड) ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात गटातटांचे राजकारण न करता सर्वांना बरोबर घेऊन त्यांच्या सहकार्यातून गेल्या पाच वर्षांत सुमारे पाच कोटी रुपयांच्यावर खर्चाची विविध विकासकामे केली आहेत. अत्याधुनिक ग्रामसचिवालय, चिल्ड्रन पार्क, सदाशिवगड पर्यटन केंद्र आदी विविध विकासकामे नजीकच्या काळात साकारली जाणार आहेत. जिल्ह्यात हजारमाची आदर्श व स्वच्छ गाव करण्याचा निर्धार असल्याचे सरपंच लता काटवटे व उपसरपंच सुजाता डुबल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

हजारमाची ग्रामपंचायतीचा कार्यकाल संपला असल्याने कारभार सध्या प्रशासनाकडे सोपवला आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या योजना व केलेली विकासकामे यांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी माजी सरपंच प्रतिभा लिमकर, सूर्यभान माने, सतीश पवार, निवासराव डुबल, दीपक लिमकर, ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते. ग्रामपंचायतीत निम्म्यापेक्षा अधिक महिला सदस्य होत्या. सरपंचपदीही महिला होत्या. महिलाराज असूनही आम्ही गावात एकजुटीने भरीव काम करून दाखवले. निष्कलंक कारभार केला, असेही सरपंच काटवटे यांनी सांगितले. 

पंचायत समितीचे माजी सदस्य दीपक लिमकर व सतीश पवार यांनी माहिती देताना सांगितले, की गावात स्वच्छ पाणीपुरवठा करून आरोग्याची काळजी घेत आहोत. गॅस क्‍लोरिफिकेशन प्रणालीद्वारे पाणी शुद्ध करून कचऱ्यापासून गांडूळ खतनिर्मिती, सहा प्रभागांत रस्ते, वीज गटारे आदी विकासकामांना प्राधान्य दिले. वृक्षारोपण, निराधार महिलांना शिवणयंत्रे, दिव्यागांना आर्थिक साहाय्य, अंगणवाड्यांना गॅस कनेक्‍शन, विद्यार्थ्यांना ई लर्निंगसाठी एलईडी संचाचे वाटप, महिला मेळावे, सर्वरोग निदान शिबिरे, तसेच शासनाच्या विविध योजना ग्रामपंचायतीद्वारे तळागाळातील सामान्य नागरिकांपर्यंत पोचवल्या. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Javali Mourns Brave Soldier Tushar Bhilare; Family Left Devastated
Decades-Old Rehabilitation Issue Nears Resolution for 29 Dhom Dam Villages in Satara
Satara Leads by Example as Farmers Produce 25,482 Quintals of Soybean Seeds
UNESCO Kas Plateau flower blooming season
Marathi News Esakal
www.esakal.com