Satara 17-year-old girl death case
esakal
सातारा : मुलांनी चुकीच्या संगतीपासून दूर राहावे, व्यसनांच्या आहारी जाऊ नये आणि शिस्तीत राहावे, यासाठी पालक सातत्याने प्रयत्न करत असतात. मात्र, सातारा जिल्ह्यातील एका घटनेत कौटुंबिक वादाने अत्यंत गंभीर वळण घेतल्याचे समोर आले आहे. १७ वर्षीय आर्या पुरुषोत्तम कदम हिचा वडिलांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.