साता-यात 179 नागरिकांना डिस्चार्ज ; 409 जणांचे नमुने तपासणीला

In Satara, 179 corona patients have been discharged
In Satara, 179 corona patients have been discharged

सातारा : जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या शुक्रवारी संध्याकाळपर्यंत 179 नागरिकांना घरी सोडण्यात आले. तसेच 409 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 12, कराड येथील 17, फलटण येथील 8, कोरेगाव येथील 16, वाई येथील 12, खंडाळा येथील 17, रायगाव येथील 29, पानमळेवाडी येथील 66, महाबळेश्वर येथील 12, पाटण 30, दहिवडी 9, खावली 71, तळमावले 15, म्हसवड 20, तरडगाव 23 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील 52 असे एकूण 409 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

घेतलेले एकूण नमुने :     253096
एकूण बाधित :                51659
घरी सोडण्यात आलेले :    49334
मृत्यू :                              1726
उपचारार्थ रुग्ण :                 599

संपादन : सुस्मिता वडतिले 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com