सातारा : पत्नीसोबतच्या अनैतिक संबंधातून मित्रानेच केला खून

वाघेरीतील खूनातील संशयीत चोवीस तासात अटक, संशयीतामध्ये एकजम पोलिस रेकॉ्रडवरील संशयीत
सातारा : पत्नीसोबतच्या अनैतिक संबंधातून मित्रानेच केला खून
sakal
Updated on: 

कऱ्हाड : वाघेरी फाट्यानजीक आर्वीतील (ता. कोरेगाव) भाजी विक्रेत्याच्या खून प्रकरणी त्याच्याच मित्रासह चौघांना तालुका पोलिसांनी चोवीस तासात अटक केली. शनिवारी रात्री उशिरा खूनाची झाली होती. पत्नीसोबत अनैतीक संबंध आहेत, त्याच रागातून खून झाला आहे. रमेश रामचंद्र पवार ( ४०, रा. आर्वी) असे खून झालेल्याचे नाव आहे. रमेशच्याच मित्राने त्याचा खून केला आहे. दिपक ऊर्फ बाळकृष्ण शरद इंगळे (वय ३८), संदीप सुभाष इंगळे (४०, दोघे रा. आर्वी) आप्पा ऊर्फ सागर धनाजी इंगळे (२८) व गणेश विठ्ठल भोसले (२३, दोघेही रा. कारंडवाडी, ता. सातारा) अटक झालेल्यांची नावे आहेत.

सातारा : पत्नीसोबतच्या अनैतिक संबंधातून मित्रानेच केला खून
सांगली : मंदिर उघडणार, नारळ फुटणार!

पोलिसांची माहिती अशी की, आर्वी येथील रमेश याचे त्याचाच मित्र असलेल्या दीपकच्या पत्नीचे अनैतिक संबध होते. त्याचा राग दीपकच्या मनात होता. त्यावरून दोघात वादही झाला होता. सनिवारी त्याचे रूपांतर खूनात झाले. भाजीपाला खरेदीला आलेल्या रमेशला वाघेरी फाटा येथील दीपकसह चौघांनी गाडी आडवी मारून खून केला. रमेश जीपमधून भाजीपाला खरेदी करून आर्वीला निघाला होता. त्यावेळी मागून तवेरातून पाठलाग करणाऱ्या दीपक व त्याच्या तीन साथीदरांनी त्यांना वाघेरी फाटा परिसरात गाठले.

सातारा : पत्नीसोबतच्या अनैतिक संबंधातून मित्रानेच केला खून
चक्क महापालिकेच्या शाळेतच सुरु होता जुगार अड्डा । Aurangabad

दीपकसोबत तिघे तर तर रमेश सोबत दोघे जण होते. दीपक व त्याच्या साथीदारांनी रमेश सोबतच्या लोकांना धमकी देवून तेथून जाण्यास सांगितले. त्यानंतर रमेशवर तलवार व लाकडी दांडक्याने वार करून त्टयाचा खून केला. त्यानंर त्यांनी तेथून पलायन केले. रमेशसोबत गेलेल्यांनी त्याला वाचिवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा उपयोग झाला नाही. रमेशचा भाऊ नवनाथलाही रमेशसोबतच्या लोकांनीमाहिती दिली.

सातारा : पत्नीसोबतच्या अनैतिक संबंधातून मित्रानेच केला खून
ॲमेझॉन म्हणजे दुसरी ईस्ट इंडिया कंपनीच; RSSच्या 'पांचजन्य'चा निशाणा

त्याने दिलेल्या पिर्यादीवरून पोलिसांनी दीपकसहीत चौघांवर गुन्हा नोंदवला होता. रात्री पसरा झालेल्या संशयीतांचा पोलिसांना सातत्याने पाठलाग सुरू ठेवला होता. पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, हवालदार सज्जन जगताप, शशिकांत काळे, अमित पवार, धनंजय कोली व उत्तम कोळी यांनी तपसाची सुत्रे हाती घेतली. पोलिस पथकाने तेथे छापा टाकून दिपक इंगळे व संदीप इंगळे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरुन आप्पा ऊर्फ सागर इंगळे व गणेश भोसले यांना अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Farmer Schemes
Chhatrapati Shivaji Maharaj History
Khambatki Ghat traffic jam today
Neera River Water Release Meeting and Protest Updat