"हा' धबधबा पहायला गेला तर कारवाई

patan
patan

आसू (जि. सातारा) : दरवर्षी श्रावणात धुमाळवाडी (ता. फलटण) येथील महादेव डोंगररांगेत असलेला निसर्गरम्य धबधबा पाहण्यास पर्यटकांची मोठी गर्दी होते. यंदा मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने पर्यटनासाठी या धबधब्यावर येण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे तरुणाईला हे निसर्ग सौंदर्याचा आनंद घेता येणार नाही. धबधबा पाहण्याच्या उद्देशाने येणाऱ्या पर्यटकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा ग्रामपंचायतीने दिला आहे. 

श्रावण महिना म्हटले, की फलटणच्या तरुणाईला धुमाळवाडी येथील महादेवाच्या डोंगररांगेत असलेला धबधबा खुणावतो. तरुणाईच्या येथील नऊ कुंडाचा धबधबा व नयनरम्य निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी तरुणाई धावते. गेल्या काही दिवसांपासून सतत पावसाच्या सरी पडत आहेत. त्यामुळे धबधबाही कोसळतो आहे, शिवाय परिसर चांगलाच हिरवाईने नटला आहे. मात्र, यंदा कोरोनामुळे तरुणाईला हे नयनरम्य निसर्गसौंदर्य अनुभवण्याबरोबरच मौजमस्ती करण्यास ब्रेक लागल्याने त्यांच्या आनंदावर विरजन पडले आहे. 

धुमाळवाडीचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील व ग्रामस्थांनी धबधबा पाहण्यासाठी येणाऱ्या विविध ठिकाणच्या पर्यटकांमुळे परिसरात कोरोना संसर्ग वाढण्याची शक्‍यता असल्याचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप व पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर 15 जुलैपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत बाहेरील व्यक्तींना धुमाळवाडीचा धबधबा परिसर प्रवेशास बंदी घातली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर तात्पुरते कुंपन घालून धबधबा व परिसर मार्ग बंद केले आहेत. 


बाहेरील व्यक्तीस धबधबा व परिसर प्रवेशास प्रशासनाने बंदी घातली असल्याने या भागात कोणाही प्रवेश करू नये, तसेच कुंपनाशेजारील स्थानिक नागरिकांना त्रास देऊ नये. तसे करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल. 

- पल्लवी पवार, पोलिस पाटील, धुमाळवाडी 

(संपादन ः संजय साळुंखे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com