या क्‍लबचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिली 12 हजार फळझाडे दत्तक

koregaon
koregaon
Updated on

वाई (जि. सातारा) ः येथील रोटरी क्‍लबतर्फे "क्‍लस्टर फार्मिंग'चा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विविध गावांतील एक हजार शेतकऱ्यांना एकत्र जोडले आहे. या प्रत्येक गावातील शेतकऱ्यांना नियमित फळे येणारी दोन हजार फळझाडे दत्तक स्वरूपात देण्यात आली आहेत. गावातील घरांच्या संख्येनुसार समप्रमाणात झाडे वाटण्यात आली आहेत. सुमारे 12 हजार झाडे शेतकऱ्यांना देण्यात आली आहेत. साधारणत: तीन ते चार वर्षांमध्ये या झाडांना फळे येतील, अशा स्वरूपाची ही झाडे आहेत. 

या उपक्रमामध्ये गाढवेवाडी-पाचपुतेवाडी, अभेपुरी, खावली, वाशिवली, वासोळे आणि घेराकेंजळ या सहा गावांचा समावेश आहे. या उपक्रमाबाबत क्‍लबचे अध्यक्ष अजित क्षीरसागर म्हणाले, ""पाचगणी, महाबळेश्वर, वाई, तसेच सातारा परिसरात फ्रूट व फूड पॅकेजिंग इंडस्ट्रीज खूप मोठ्या प्रमाणात आहेत. या प्रत्येक कंपन्यांना नेहमीच विविध प्रकारची फळे मोठ्या प्रमाणात लागतात. फक्त टोमॅटो आणि स्ट्रॉबेरी एवढेच फळ या कंपन्यांना लागतात असे नाही. म्हणून आम्ही क्‍लस्टर फार्मिंगचा विचार केला. या शेतकऱ्यांच्या माध्यमातून वाई परिसरात 12 हजार फळझाडे लावली जातील. त्या झाडांपासून चार वर्षांमध्ये शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार निर्मितीचे साधन तयार करण्यासाठी हे नियोजन आहे. शेतकऱ्यांना जांभूळ, आवळा, चिंच, पेरू, सीताफळ, शिकाकाई आणि रिठा अशी रोपांचे वाटप केले आहे. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी अध्यक्षांसह सचिव जितेंद्र पाठक, दीपक बागडे, स्वाती हेरकळ, मदन पोरे, सुनील शिंदे, प्रमोद शिंदे, मदनकुमार साळवेकर, डॉ. सुनील देशपांडे, डॉ. शंतनू अभ्यंकर, डॉ. प्रशांत पोळ, रामप्रसाद घाटगे, गणेश दौंड आदी रोटरी सदस्य परिश्रम घेत आहेत. 

(संपादन ः संजय साळुंखे) 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shocking Incident in Wai; Woman Student Found Dead in Dhom Canal
Satara Gears Up for Legislative Council Battle; BJP Eyes Strong Candidates
Kolhapur Board Receives Proposal to Cancel Recognition of Panchgani’s Pinewood School
Maratha Heritage Comes Alive as Satara Museum Adds New Galleries on Shivaji Era
Marathi News Esakal
www.esakal.com