
सातारा : अंगणवाडी सेविकांकडून लाडक्या बहीण योजनेतील महिलांचे फॉर्म भरून घेण्यात आले. त्याचा मोबदला अद्याप सेविकांना मिळालेला नाही. असे असताना आता ई-पीक पाहणीचे काम लादले जाणार आहे. या कामाशी महिला व बालविकास विभागाचा कसलाही संबंध नाही, तरीही हे काम अंगणवाडी सेविकांवर लादले जात आहे. याविरोधात जिल्हा पूर्व प्राथमिक शिक्षिका, सेविका संघाच्या वतीने जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.