
बुध (जि. सातारा) : फलटण-पुसेगाव मार्गावरील पुसेगाव ते मांजरवाडी दरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम सुमारे 60 टक्के पूर्ण होत आले असून, पूर्ण झालेल्या नव्या रस्त्यावर महिन्याभरात खड्डे पडू लागल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्रचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे खड्ड्यांचा प्रश्र पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
गेले दहा महिने पुसेगाव ते मांजरवाडी रस्त्याच्या रुंदीकरणाचे व छोट्या-मोठ्या पुलांची कामे सुरू आहेत. रस्त्याच्या कामापूर्वी भविष्यात अडचण येऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी रस्त्यावर आडव्या चाऱ्या खोदून पाइपलाइनची कामे पूर्ण केली. रस्त्याच्या खडीकरण, डांबरीकरणापूर्वी चाऱ्याच्या ठिकाणचा रस्ता खचू नये यासाठी चाऱ्या खडी, डांबर टाकून मजबूत करणे आवश्यक होते. मात्र, याकडे दुर्लक्ष करून संबंधित ठेकेदाराने घाई-गडबडीत रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण केले.
परिणामी आज फडतरवाडी (नेर) ते काटेवाडी फाटा व ललगुण ते शिंदेवाडी फाटा दरम्यानचा रस्ता दहा दहा फुटांवर शेकडो ठिकाणी खचून नवीन रस्त्यावर खड्डे पडले आहेत. रस्ता नवीन असल्याने दुचाकी व चारचाकी वाहने वेगाने जात असून, खचलेल्या चाऱ्यात जोराने आदळत आहेत. चाऱ्याशिवाय या मार्गावरील वेटणे ओढा पुलासह अनेक ठिकाणी नवीन रस्ता खचून तर काही ठिकाणी उचकटून खड्डे पडले आहेत.
पूर्वीचा रस्ता काय वाईट होता?
प्रशासनाच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा करून नवीन होणारा रस्ता याच दर्जाचा असेल तर मग पूर्वीचा रस्ता काय वाईट होता? असा प्रश्न वाहनचालक व प्रवासी वर्गातून उपस्थित केला जात आहे.
संपादन : पांडुरंग बर्गे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.