
सातारा जिल्ह्यात आठ ही विधानसभा मतदारसंघात महायुतीची सरशी झाली आहे. त्यामुळे पुन्हा शंभूराज देसाईंसह शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, मकरंद पाटील आणि पहिल्यांदा आमदार झालेले अतुल भोसले, मनोज घोरपडे, सचिन पाटील यांच्यापैकी कोणाला संधी मिळणार, याची उत्सुकता लागली आहे.
सातारा : विधानसभा निवडणुकीच्या निकालात जिल्ह्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने आता जिल्ह्यात कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार, याची उत्सुकता लागली आहे. यापूर्वी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, मकरंद पाटील यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली होती.