सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयात युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

satara

सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयात युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

सातारा : शेरेवाडी येथील युवकाने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. सचिन स्वामी असे संबंधित युवकाचे नाव असून ग्रामपंचायत पदाधिकारी आणि तंटामुक्ती अध्यक्ष तसेच माने कुटुंबियांच्या त्रासाला कंटाळून आपण हे कृत्य केल्याचे त्यांने सांगितले. पोलिसांनी संबंधित युवकाला ताब्यात घेतले असून त्यांच्यावर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आज दुपारी सचिन स्वामी या युवकाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी तातडीने हालचाल करुन सदर युवकास रोखले व त्याच्या हातातून काडेपेटी काढून घेतली. त्यामुळे अनर्थ टळला. शेरेवाडी (ता. सातारा) येथील ग्रामपंचायत पदाधिकारी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व गावातील माने कुटुंबियाच्या त्रासाला कंटाळून त्याने हा प्रकार केल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी संबंधित युवकाला ताब्यात घेऊन सातारा शहर पोलिस ठाण्यात नेले. तेथे त्याच्यावर आत्मदहनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा: अभिनेता अनिकेतवर पत्नीच्या छळाचा गुन्हा दाखल;पाहा व्हिडिओ

यासंदर्भात संबंधित युवकाने आपल्यावर अन्याय झाला असून यासंदर्भात मी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाव्दारे तक्रार केली आहे. त्याकडे जिल्हा प्रशासनाने दूर्लक्ष केल्याने गावातील पदाधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आपण हानिर्णय घेतल्याचे सांगितले.

loading image
go to top